शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

कर्ज प्रकरणे नामंजूर केल्याबध्दल शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:00 PM

आण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्ज प्रकरणे जाणीवपूर्वक नामंजूर करणाऱ्या स्टेट बॅँकेच्या अयोध्या टॉवरमधील विभागीय कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या गजरात मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅँक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देकर्ज प्रकरणे नामंजूर केल्याबध्दल शिवसेनेचा मोर्चामराठा तरुणांची अडवणूक : स्टेट बँकेचे अधिकारी धारेवर

कोल्हापूर : आण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्ज प्रकरणे जाणीवपूर्वक नामंजूर करणाऱ्या स्टेट बॅँकेच्या अयोध्या टॉवरमधील विभागीय कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या गजरात मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅँक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून चांगलेच धारेवर धरले.दुपारी बाराच्या सुमारास दाभोळकर कॉर्नर येथून महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मराठा युवकाला तुच्छ लेखणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्यांचा निषेध असो, मुख्यमंत्र्यांसह महामंडळाने हमी घेऊनही कर्ज प्रकरणे नामंजूर करणाऱ्या बँकेचा निषेध असो, अशा घोषणा देत हा मोर्चा बँकेच्या कार्यालयावर आला. साहाय्यक सरव्यवस्थापक प्रदीप देव उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी मुख्य व्यवस्थापक बळीराम नाखवा हे शिष्टमंडळाला सामोरे गेले.संजय पवार यांनी मुख्यमंत्री व महामंडळाने कर्जाची हमी घेऊनही तुम्हाला कर्ज प्रकरणे मंजूर करायला काय अडचणी आहेत? अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. मराठा समाजातील तरुणांना कर्ज द्यायला लाज वाटते काय? परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून भूमिपूत्र असलेल्या मराठा समाजातील तरुणांना तुच्छतेची वागणूक दिली जात आहे, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. नाखवा यांनी आमच्या बॅँकेसह शाखाधिकाऱ्यांकडून चुका झाल्या असल्यास त्याबध्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले.आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, शशी बिडकर, शुभांगी पोवार, राजेंद्र पाटील, हर्षल सुर्वे, मनजित माने, रणजित आयरेकर, दुर्गेश लिंग्रस, वंदना पाटील, मेघना पेडणेकर, आदींचा समावेश होता.

 

स्टेट बँकेकडे या महामंडळाची एकूण १६ कर्ज प्रकरणे आली होती. त्यातील बहुतांशी मंजूर झाली असून कागदपत्रांची पूर्तता नसल्याने कांही मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत. आमच्या बँकेकडे आलेली प्रकरणे तातडीने मंजूर व्हावीत असा प्रयत्न आहे.बळीराम नाखवामुख्य व्यवस्थापक (ग्राहक सेवा)स्टेट बँक विभागीय कार्यालय

पुढील मोर्चा युनियन बॅँकेवरमहामंडळाकडील कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅँकांविरोधात मोर्चे काढण्याची मालिका सुरूच राहणार आहे. पुढील मोर्चा लवकरच युनियन बॅँकेवर काढण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

सुरेश साळोखे शिवसेनेत सक्रीयगेल्या काही वर्षांपासून शिवसेनेपासून अलिप्त असलेले माजी आमदार सुरेश साळोखे पहिल्यांदाच शिवसेनेच्या मोर्चाच्या निमित्ताने सक्रीय झाल्याचे दिसले. ते काही दिवसांतच अधिकृतरीत्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर