जोतिबाच्या सेवेतील 'उन्मेष' अश्वाने घेतला अखेरचा श्वास, दशकभर होता सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 19:42 IST2022-03-02T19:36:57+5:302022-03-02T19:42:38+5:30

जोतिबा  : जोतिबा देवाच्या सेवेत असणारा उन्मेष अश्वाचे निधन झाले. दोन दिवसापासून तापाने आजारी असलेल्या देवसेवक अश्वाने आज, बुधवारी ...

Death of Unmesh horse in Jyotiba service | जोतिबाच्या सेवेतील 'उन्मेष' अश्वाने घेतला अखेरचा श्वास, दशकभर होता सेवेत

जोतिबाच्या सेवेतील 'उन्मेष' अश्वाने घेतला अखेरचा श्वास, दशकभर होता सेवेत

जोतिबा  : जोतिबा देवाच्या सेवेत असणारा उन्मेष अश्वाचे निधन झाले. दोन दिवसापासून तापाने आजारी असलेल्या देवसेवक अश्वाने आज, बुधवारी दुपारी ४ वाजता प्राण सोडला. देवाच्या सेवेत असणाऱ्या अश्वाच्या निधनाची बातमी समजताच भाविक व पुजाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

अश्वाची मंदिर परिसरातून ट्रॉलीतून अत्यंयात्रा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी उन्मेष' अश्वाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

गेली १० वर्षे जोतिबाच्या सेवेत उन्मेष अश्व होता. जोतिबाची पालखी, धुपारती सोहळाच्या पुढे असणारा उन्मेष आता दिसणार नाही. प्रत्येक शनिवारी दुपारी १२ ते ३ पर्यंत देवाच्या समोर उभा रहात होता.

Web Title: Death of Unmesh horse in Jyotiba service