देवाळे (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील मसूदमाले येथील योगेश चंद्रकांत सणगर (वय 27) याचा बोहल्यावर चढण्याआधीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याचे आज शुक्रवारी लग्न होते. त्याच्या लहान भावाचे आठ महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने तर वडिलांचे दीड वर्षापूर्वी कॅन्सरने निधन झाले होते. दीड वर्षात कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने मसूदमाले आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.योगेशचे आज, शुक्रवारी लग्न होणार होते. घरात लग्नाची घाई गडबड सुरु असताना त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला तातडीने कोडोली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच त्याला दुसरा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.योगेश महावितरणमध्ये काम करीत होता. योगेशचा लहान भाऊ निलेश सणगर हा इंजिनिअर होता. त्याचाही आठ महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर वडील चंद्रकांत सणगर हे शासकीय आयटीआय सेवेत होते. वडीलापाठोपाठ लहान भावाचे निधन झाल्याने योगेशवर घराची सर्व जबाबदारी होती. पण लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच योगेशचाही दुर्दैवी मृत्यू झाला. योगेशच्या पश्चात आई, दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.
लग्नाच्या आदल्यादिवशी वराचा हृदयद्रावक मृत्यू, दीड वर्षात कुटुंब उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:36 IST