मळणी मशीनमध्ये आडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:37 IST2021-03-17T18:35:17+5:302021-03-17T18:37:40+5:30
Accident Kolhapur-शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर आडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंदूबाई पांडूरंग माळी (वय ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.

मळणी मशीनमध्ये आडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर आडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंदूबाई पांडूरंग माळी (वय ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ९ मार्च रोजी शेतात मळणीचे काम सुरु असताना इंदूबाई माळी यांच्या साहीचा पदर त्या मळणी मशीनच्या पंख्यात आडकला. त्यामुळे पंख्यात साडी गुरफटून माळी यांच्या गळ्याला साडीचा फास लागला. त्यावेळी शेजारी काम करणार्यांनी तातडीने मशीन बंद करुन त्यांची सुटका केली.
त्यांना ताडीने खासगी रुग़्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सीपीआर पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली आहे.