आईच्या विरहाने मुलाचाही मृत्यू

By Admin | Updated: December 16, 2014 23:18 IST2014-12-16T23:18:39+5:302014-12-16T23:18:39+5:30

वृत्त समजताच कोल्हापूर, सांगली, बेळगावमधीलैं उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, महसूल अधिकारी, आदींनी बाळेघोल येथे त्यांचे अंतिम दर्शन घेतले

Death of a child, even in mother's womb | आईच्या विरहाने मुलाचाही मृत्यू

आईच्या विरहाने मुलाचाही मृत्यू

सेनापती कापशी : बाळेघोल (ता. कागल) येथील हौसाबाई लक्ष्मण तोरस्कर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने काल, सोमवारी निधन झाले. हे वृत्त कळताच त्यांचा मुलगा उद्योजक शंकरराव तोरस्कर त्याच दिवशी दुपारी तीन वाजता बाळेघोल येथे आले. आईवर अंत्यसंस्कार करून रात्री झोपल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचाही मृत्यू झाला. आई व मुलाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे शोककळा पसरली आहे.शंकरराव लक्ष्मण तोरस्कर (वय ६०) उद्योगपती म्हणून सुपरिचित आहेत. बाळेघोलसारख्या खेडेगावातून गरिबीवर मात करत जिद्दीने ते यशाच्या शिखरावर पोहोचले होते. तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांचे दातृत्व लाभले आहे.गेली अनेक वर्षे संघर्षातून त्यांनी आपले आयुष्य घडविले, जीवनात आलेल्या अनेक संकटांशी त्यांनी सहज सामना केला, पण आईच्या निधनाचे दु:ख ते पचवू शकले नाहीत.
हे वृत्त समजताच कोल्हापूर, सांगली, बेळगावमधीलैं उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, महसूल अधिकारी, आदींनी बाळेघोल येथे त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.



जानेवारीत त्यांच्या एकसष्ठीनिमित्त सेनापती कापशी येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात मोठा कार्यक्रम होणार होता. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली होती, पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हते.

Web Title: Death of a child, even in mother's womb