Kolhapur News: पोषण आहारात आढळली मेलेली बेडकी, पुरवठा थांबवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:20 IST2026-03-07T18:20:12+5:302026-03-07T18:20:24+5:30

हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाचे वातावरण पसरले

Dead frog found in nutritional food in Gaganbawada kolhapur, supply stopped | Kolhapur News: पोषण आहारात आढळली मेलेली बेडकी, पुरवठा थांबवला

Kolhapur News: पोषण आहारात आढळली मेलेली बेडकी, पुरवठा थांबवला

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील शेणवडेपैकी चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेली बेडकी आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तालुक्यातील पोषण आहाराचे वाटप थांबवण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागांतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना सकस आहार दिला जातो. यामध्ये डाळ, तांदूळ, तिखट, मीठ आणि ‘सुकडी’च्या पाकिटांचा समावेश असतो. चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून लाभार्थ्यांना या आहाराचे वाटप करण्यात आले होते. मात्र, एका लाभार्थ्याने जेव्हा ‘सुकडी’चे पाकीट उघडले, तेव्हा त्यात मेलेली बेडकी मृतावस्थेत आढळली.

हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाचे वातावरण पसरले. सरकारी योजनेतून मिळणाऱ्या अन्नातच जर अशा प्रकारे घाण आणि मृत प्राणी आढळत असतील, तर मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात या पोषण आहाराचा पुरवठा एकाच ठेकेदाराकडून केला जातो. त्यामुळे पॅकेजिंगच्या वेळी ही बेडकी पाकिटात गेली कशी? उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

गगनबावडा तालुक्यातील हा प्रकार समजला. त्यानंतर तातडीने पोषण आहाराचे वाटप थांबवण्यात आले आहे. शनिवारी या प्रकाराची सखोल माहिती घेण्यात येणार आहे. - नितीन मस्के, जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी

Web Title : कोल्हापुर: पोषण आहार में मिली मरी हुई मेंढक, वितरण रोका गया

Web Summary : कोल्हापुर के आंगनवाड़ी में पोषण आहार के पैकेट में मरी हुई मेंढक मिलने से हड़कंप मच गया। वितरण रोक दिया गया है। घटना के बाद स्वच्छता मानकों और आपूर्तिकर्ता की जवाबदेही की जांच जारी है। माता-पिता सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं।

Web Title : Dead Frog Found in Kolhapur Nutrition Kit, Distribution Halted

Web Summary : A dead frog was discovered in a nutrition packet distributed by an Anganwadi in Kolhapur, causing outrage. Distribution has been stopped. An investigation is underway regarding hygiene standards and the supplier's accountability after this incident. Parents are demanding strict action.