शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्यात डॉल्बी बंदी कधी?

By admin | Updated: June 11, 2015 00:17 IST

तरुणांची वरातीत हुल्लडबाजी : मद्यपानाबरोबरच अनेक व्यसनांमुळे चिंता

कृष्णा सावंत - पेरणोली -आजरा तालुक्यात वरातीमधील तरुणांची हुल्लडबाजी चिंताजनक असून, डॉल्बीच्या अमर्याद आवाजामुळे आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात वरातीच्या नावाखाली सुरू झालेल्या व्यसनाधिनतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.सध्या लग्नसराईचा हंगाम जोरदार सुरू असल्यामुळे तरुणाईचे पाय प्रत्येक वरातीमध्ये थिरकत आहेत. नृत्य करणे हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. नृत्यामुळे निखळ आनंद मिळतो व मानसिकदृृष्ट्या माणूस सक्षम होतो हे खरे आहे. परंतु वरातीत नृत्याच्या नावाखाली तरुणांचे सुरू झालेला धिंगाणा, नृत्यासाठी ‘किक’ बसावी म्हणून सुरू असणारे मद्यपान मात्र चिंताजनक बनले आहे.आजरा तालुक्यात खास वरातीसाठी १००-१५० तरुणांचे टोळके बनले आहे. दारुची व्यवस्था केली की कुणीही कुठल्याही गावात आॅर्डर द्यायची की, ते टोळके हजर. यातील अनेक तरुण प्रत्येक गावांत जाऊन वरातीमध्ये धिंगाणा घालत आहेत. या टोळक्यासाठी वधू-वरांचे पालक लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत.वरातीच्या नावाखाली दारूचा महापूर सुरू झाला आहे. समाजात गरजूंना गोरगरिबांना कधीही मदत न करणारे पालक मात्र हौसेपोटी लाखो रुपये दारुवर खर्च करीत आहेत. आठवीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतची मुले वरातीमधून दारू, गांजा, सिगारेटच्या आहारी जात आहेत. समाजाला दिशा देण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांना वरातीमधून चुकीची दिशा मिळत आहे.डॉल्बीच्या दणक्याने हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालेल्या जिल्ह्यातील घटना ताज्या असतानाही पालकवर्ग तरुणांच्या हट्टापोटी डॉल्बी लावत आहेत. पूर्वीची लग्नामधील भारतीय परंपरेची समयी, ब्रँड, हद्दपार झाल्याने डॉल्बीला महत्त्व वाढले आहे. डॉल्बीच्या अतिरेकामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे वरातीमधील डॉल्बी व व्यसनाधिनता कमी करण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेत ठराव करून अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.बालवयातच व्यसनवरातीमध्ये अनेक लहान मुले नाचतात. तरुणांकडील दारूचे बॉक्स पाहून अनेक लहान मुलांनाही बालवयातच व्यसन लागत आहे. ही वस्तुस्थिती सध्या ग्रामीण भागात आहे.