कोल्हापूरच्या माळरानात सापडला ‘दारकरी कोळी’, अधिवास धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:24 IST2026-02-05T14:23:41+5:302026-02-05T14:24:18+5:30

सत्पाल गंगलमाले यांनी शोधली 

Darkari Koli found in Kolhapur Malranas, habitat in danger | कोल्हापूरच्या माळरानात सापडला ‘दारकरी कोळी’, अधिवास धोक्यात

कोल्हापूरच्या माळरानात सापडला ‘दारकरी कोळी’, अधिवास धोक्यात

कोल्हापूर : शहरातील नैसर्गिक माळरानांत दारकरी कोळ्याच्या (ट्रॅपडोअर स्पायडर) एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. अधिवासात होत असलेल्या मानवनिर्मित बदलांमुळे ही प्रजाती स्थानिक पातळीवर नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. हे संशोधनशिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक सत्पाल गंगलमाले यांच्या पीएच.डी. अभ्यासाचा भाग आहे.

कोल्हापूरचे दिले नाव

बिळांना दारासारखी रचना करून दबा धरून भक्ष्य पकडणाऱ्या या कोळ्यांना इंग्रजीत ‘ट्रॅपडोअर स्पायडर’ तर मराठीत ‘दारकरी कोळी’ म्हणून ओळखले जाते. दातांची रचना व आठ डोळ्यांच्या मांडणीच्या आधारे या नव्या प्रजातीचा समावेश ‘टायटन इडिओप्स’ या वंशात केला असून, कोल्हापुरातील आढळावरून तिला ‘टायटनइडिओप्स कोल्हापूरएन्सिस’ असे नाव दिले आहे.

रातकिडे, छोटे कीटक हे खाद्य

हा दारकरी कोळी गवताळ माळरानांवरील सपाट किंवा उताराच्या जमिनीत उभी अथवा तिरकी बिळे करतो. बिळाच्या तोंडाशी असलेले दरवाजे भोवतालच्या मातीशी पूर्णपणे मिसळलेले असल्याने ते सहज ओळखू येत नाहीत. रातकिडे व छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

विदेशी वृक्ष ठरताहेत घातक

संशोधनादरम्यान नैसर्गिक माळरानांवर या कोळ्यांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली; मात्र उंदीरमारीसारख्या विदेशी वृक्षांची लागवड केलेल्या भागात या प्रजातीचे कोणतेही अस्तित्व आढळले नाही.

Web Title : कोल्हापुर में मिला नई दारकरी मकड़ी प्रजाति, आवास खतरे में

Web Summary : कोल्हापुर के घास के मैदानों में दारकरी मकड़ी (*Titanidiops kolhapuransis*) की एक नई प्रजाति मिली। शोधकर्ताओं ने चेतावनी दी है कि विदेशी पेड़ों के रोपण जैसे आवास परिवर्तन, इस प्रजाति को खतरे में डालते हैं, जिससे स्थानीय विलुप्ति हो सकती है। मकड़ियाँ छोटे कीड़ों और झींगुरों का शिकार करती हैं।

Web Title : New Trapdoor Spider Species Discovered in Kolhapur, Habitat Threatened

Web Summary : A new trapdoor spider species, *Titanidiops kolhapuransis*, was discovered in Kolhapur's grasslands. Researchers warn that habitat changes, like the planting of foreign trees, threaten this species, potentially leading to local extinction. The spiders prey on small insects and crickets.