शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खामकरवाडी-कुरणेवाडी दरम्यानचा बंधारा बनला मृत्यू सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीकांत ऱ्हायकर / धामोड : धामोडपासून गगनबावड्याला जवळचा रस्ता म्हणून धामोड-कुरणेवाडी- खामकरवाडी-म्हासुर्ली या मार्गाची प्रवासी निवड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीकांत ऱ्हायकर / धामोड : धामोडपासून गगनबावड्याला जवळचा रस्ता म्हणून धामोड-कुरणेवाडी- खामकरवाडी-म्हासुर्ली या मार्गाची प्रवासी निवड करतात; पण या रहदारीच्या मार्गावर कुरणेवाडी व खामकरवाडीच्या दरम्यान असणारा बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने गेल्या चार दिवसांत दोन मोठे अपघात झाले आहेत. या बंधाऱ्यांवर संरक्षक कठडे करण्याची मागणी खामकरवाडी-कुरणेवाडी ग्रामस्थांकडून होत असून, ते तत्काळ न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

गगनबावड्याला राधानगरीस जोडणारा हा बंधारा दळणवळणासाठी महत्त्वाचा दुवा आहे. या बंधाऱ्यामुळे संपूर्ण धामणी खोरे आजही तुळशी खोऱ्याशी अखंडपणे जोडलेले आहे. पण २५ वर्षांत एकदाही या बंधाऱ्याची डागडुजी न झाल्याने सध्या या बंधाऱ्याचे पिलर कमकुवत तर झाले आहेतच; शिवाय बंधाऱ्याचे संरक्षक कठडे पूर्णत: मोडले आहेत.

सध्या या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. शाळा-कॉलेजला प्रवास करणारे या दोन्ही खोऱ्यांतील विद्यार्थी याच मार्गावरून भोगावती, कोल्हापूर, राधानगरी यांसारख्या ठिकाणी कॉलेजला ये-जा करीत असतात. परिणामी वाहनांची संख्या या मार्गावरून जास्त असताना पाहावयास मिळते. दोन्ही बाजूंनी प्रचंड उतार असल्याने या बंधाऱ्यावर दोन्ही बाजूंनी जोराच्या गतीने वाहने खाली उतरतात. त्यातच या बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने वाहनांना ओव्हरटेक करताना वाहन थेट नदीपात्रात कोसळते व अपघात होतात.

गेल्या आठवड्यात या पुलावरून दोन मोटारसायकलस्वार अलगदपणे पुलावरून नदीपात्रात कोसळले. नदीपात्रात पाणी तुंबले असल्याने त्यांना फार इजा झाली नाही . पण एखादे मोठे वाहन या बंधाऱ्यावरून खाली कोसळले तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या बंधाऱ्यावर संरक्षक कठडे बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळी : खामकरवाडी-कुरणेवाडी दरम्यानचा संरक्षक कठड्याअभावी उभा असलेला हा बंधारा.

छाया - श्रीकांत ऱ्हायकर