जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे झालेल्या दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश बजरंग दळवी (वय २९, रा. दानोळी) याला आज, शुक्रवारी जयसिंगपूर पोलिसांनी सांगली येथे ताब्यात घेतले. आज येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे कले असता २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, दुसरा संशयित आरोपी अभिजित धडेल (रा. कोथळी) हा अजूनही फरार आहे. २६ एप्रिल कोथळी येथे जातीय दंगल घडली होती. दोन्ही गटाकडील शंभरजणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. गावातील हा वाद मिटावा यासाठी अनेक प्रयत्न झाले. वाद मिटणार अशी चिन्हे होती. दरम्यान, दंगलीत जखमी झालेले तुलसीदास कांबळे (वय ६०) यांचा मृत्यू झाल्यामुळे गावात पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेतील संशयितांना अटक करावी, अशी मागणी दलित संघटनांनी पोलिसांकडे केली होती. कांबळे यांच्या मृत्यूनंतर ४३ जणांवर खुनाचाही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील मुख्य सूत्रधार महेश दळवी याला सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने सांगली येथे ताब्यात घेतले. येथील प्रथमवर्ग न्यायालयात दळवी याला उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दळवी याला अटक झाली आहे. दुसरा संशयित धडेल हा अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डोके यांनी दिली. (प्रतिनिधी)
कोथळी दंगलीतील मुख्य सूत्रधार दळवीला अटक
By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST
जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे झालेल्या दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश बजरंग दळवी (वय २९, रा. दानोळी) याला आज, शुक्रवारी जयसिंगपूर पोलिसांनी सांगली येथे ताब्यात घेतले.
कोथळी दंगलीतील मुख्य सूत्रधार दळवीला अटक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}