Kolhapur: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:28 IST2025-10-24T15:26:54+5:302025-10-24T15:28:14+5:30
राधानगरी : दाजीपूर जंगल सफारी आज, शुक्रवार (दि.२४) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर ...

छाया- गौरव सांगावकर
राधानगरी : दाजीपूर जंगल सफारी आज, शुक्रवार (दि.२४) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यामुळे अभयारण्य बंद ठेवण्यात येते. यंदा मात्र १४ मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे १५ मे पासूनच प्रवेश बंद करण्यात आला होता. दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढल्याने अखेर जंगल सफारी सुरु करण्यात आली.
दिवाळी सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. अशातच गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एकमेव दाजीपूर (राधानगरी) अभयारण्य सफारीसाठी बंद असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांनी जंगल सफारी तात्काळ सुरु करावी अशा मागणीचे निवेदन वनविभागाला दिले.
याची दखल घेत सध्या पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन सद्यस्थिती वाहन जिथे जाते तिथं पर्यत जंगल सफारी सुरु राहणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांनी दिली.