शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

लाच मागितल्याद्दल दुग्धचे सहनिबंधक जाधव जाळ्यात; मुंबईत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:40 IST

Bribe Case- भुदरगड तालुक्यातील (जि. कोल्हापूर) दूध संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहनिबंधक (दुग्ध) बी. एल. जाधव (वय ५७, रा. सध्या मुंबई, मूळ सिडको, औरंगाबाद) यांना मंगळवारी अटक केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देलाच मागितल्याद्दल दुग्धचे सहनिबंधक जाधव जाळ्यात; मुंबईत कारवाईऔरंगाबादमध्ये घेतली घराची झडती

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील (जि. कोल्हापूर) दूध संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहनिबंधक (दुग्ध) बी. एल. जाधव (वय ५७, रा. सध्या मुंबई, मूळ सिडको, औरंगाबाद) यांना मंगळवारी अटक केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.

मुंबईतील वरळी येथील दुग्ध विकास विभागाच्या आयुक्तांच्याच कार्यालयात त्यांना कारवाईची पूर्वकल्पना देऊन ही कारवाई करण्यात आली. जाधव हे वर्ग एक श्रेणीचे अधिकारी असून, वर्षानंतर निवृत्त होणार आहेत. त्यांच्या मुंबई व औरंगाबाद येथील घरांची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.पोलिसांनी सांगितले, लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील जय शिवराय दूध संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी त्याच गावातील हिंदुस्थान सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेने केली होती. या गावात पाच दूध संस्था आहेत. इतर संस्थांनी ना हरकत दाखले दिले; परंतु हिंदुस्थान संस्थेने जय शिवरायच्या संस्थानोंदणीस पुण्यातील विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे हरकत घेतली. त्यांनी अपिल फेटाळून लावून नोंदणी कायम ठेवली.

या निर्णयाविरोधात फिर्यादीने सहनिबंधक (दुग्ध) जाधव यांच्या कार्यालयाकडे अपील केले. त्याची ३ ऑक्टोबर २०१९ ला सुनावणी झाली व प्रकरण निवाडा देण्यासाठी बंद करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची कार्यालयात भेट घेतल्यावर त्यांनी ४० हजार लाचेची मागणी केली व निकाल तुमच्यासारखा देतो असे सांगितले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांसह कोल्हापूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत खोंद्रे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार १६ ऑक्टोबर २०१९ ला लाच मागणी पडताळणी केली असता त्यांनी २५ हजार रुपये मागितल्याचे सरकारी पंचांसमक्ष स्पष्ट झाले. परंतु त्यानंतर त्यांना कारवाईची कुणकुण लागल्याने पैसेच स्वीकारले नाहीत. परंतु अपिलाचा निर्णय दिला. त्यामध्ये कोल्हापूरचे तत्कालीन साहाय्यक निबंधक अरुण चौगले यांची चौकशी करून अहवाल पाठवावा, जय शिवराय संस्थेची नोंदणी कायम ठेवत हिंदुस्थानी संस्थेला योग्य त्या प्राधिकारणाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कोरोनामुळे अन्य काही कारणाने हे प्रकरण प्रलंबित राहिले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर आयुक्त गौतम लखमी यांनी या प्रकरणात लक्ष घालून नव्याने तपास करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक अमोल शिंदे यांना दिले. त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने सोमवारी (दि. २१) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये रीतसर गुन्हा (गुन्हा नंबर २५-२०२०) दाखल केला.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणkolhapurकोल्हापूरAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस