शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या स्फोटात घराला आग

By admin | Updated: October 18, 2015 01:21 IST

पाच लाखांचे नुकसान : चंदगड तालुक्यातील शिनोळी बुद्रुकची घटना

चंदगड : शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील शेतकरी वैजनाथ गुंडू गवसेकर यांच्या घराला शॉर्टसर्किटने शनिवारी आग लागली. या आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झाले. आगीत प्रापंचिक साहित्यासह पाच लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मराठी शाळेजवळ कल्मेश्वर गल्लीत असलेल्या वैजनाथ गवसेकर यांच्या घराला शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. घरात कोणीच नसल्याने प्रथमत: आगीची कल्पना आली नाही. पण, वाऱ्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ दिसल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. कामानिमित्त बाहेर गेलेल्या निंगुबाई गवसेकर घरी आल्यानंतर घरी गॅस असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. आगीचे रौद ्ररूप पाहून सिलिंडर काढण्यास कोणीही तयार झाले नाही. दरम्यान, आगीच्या भडक्याने सिलिंडरचा स्फोट झाला व पुन्हा आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आगीचे तांडव इतके भयानक होते की, आग आटोक्यात आलीच नाही. शेवटी बेळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तीन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश आले. या आगीत या शेतकऱ्याचे तिजोरी, कपाट जळले. या कपाटात रोख ४0,000, महत्त्वाची कागदपत्रे, विमा प्रमाणपत्र, २0 पोती भात, नाचणा, सोन्याचे गंठण, चेन, संसारपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वैजनाथ गवसेकर यांच्या घराला लागून असलेल्या भरमू कृष्णा गवसेकर यांच्या घरालाही आग लागून स्वयंपाक घरातील साहित्य जळाले आहे. दरम्यान, मंडळ अधिकारी एन. के. मुत्नाळे, तलाठी व्ही. एल. कांबळे व चंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)