शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीत रात्री अकरा ते सहा संचारबंदी-महापालिकेकडून पथकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:21 IST

कोल्हापूर : परदेशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ ...

कोल्हापूर : परदेशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश सोमवारी दिले. या संदर्भात महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेची पथके तयार केली असून पथकातील कर्मचारी या काळात गस्त घालणार आहेत.

परदेशात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून तेथे पुन्हा या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन अंतर्गत पुन्हा काही बंधने घातली आहेत. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत ख्रिसमसच्या सुट्या आणि ३१ डिसेंबर येत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची व कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

----

इंदुमती गणेश