या मगरींचे वारंवार दर्शन रात्रीच्या सुमारास होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही जण सकाळच्या वेळेस पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी बंधाऱ्यावर येत असतात. शेतकरीही शेतीच्या कामासाठी नदीकाठावर सतत ये-जा करत असतात. तसेच रात्रीच्या वेळी अनेक कामगारसुद्धा येथून जात असतात.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बंधाऱ्याजवळ किमान चार ते पाच मगरींचा वावर असावा अशी चर्चा आहे. त्यामुळे याबाबत वन्य जीव विभागाने या मगरींना पकडून अन्य मोठ्या जलाशयात सोडून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो : २३ बावडा मगर
कॅप्शन - कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा मगरीचे दर्शन झाले.