शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:02 AM

पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत टॅँकरचे दर अडलेल्या नागरिकांची लूट, पूरपरिस्थितीत हरवली माणुसकी

कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे.

या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा टॅँकरचालकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही याबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत.महापालिकेच्या बहुतांश पाणी पुरवठा योजना पाण्यात असून, त्याची दुुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापुरामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे; त्यामुळे शहरासह उपनगरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या काळात थोडी माणुसकी दाखविणे गरजेचे होते; परंतु अशा कठीण काळात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार खासगी टॅँकरवाल्यांकडून सुरू आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत विकला जात आहे.

एका बाजूला शासन प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिक पूरग्रस्तांना मदतीचा हात देत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला आपलीच माणसं आपल्या माणसांना लूटत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव या पाचपट दराने लोक पाणी विकत घेऊन आपली गरज भागवत आहेत.

टॅँकरवाल्यांना मोफत पाणी द्या, असे आम्ही म्हणत नाही, मूळ दरामध्ये १00-२00 वाढवून द्यायलाही हरकत नाही; परंतु अशा पद्धतीने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पाण्याची चालविलेली लूट योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. शहरासह कळंबा, पाचगाव, फुलेवाडी, जाधववाडी, बालिंगा, मोरेवाडी परिसरातील उपनगरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथे अशा पद्धतीने टॅँकरवाल्यांकडून जादा पैसे आकारणी सुरू आहे.

कृत्रिम बुकिंग दाखवून लूटपाणीटंचाईच्या काळात टॅँकरसाठी खोटे कृत्रिम बुकिंग दाखवून वाढीव दराने पाण्याचे टॅँकर विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. नागरिकही अशा पद्धतीने वास्तव असेल, या गैरसमजातून वाढीव पैसे मोजत आहेत. ही बाब गंभीर आहे.

 

टॅँकरमालकांकडून अशा पद्धतीने पैसे आकारून नागरिकांची लूट करणे अयोग्य आहे, अशा टॅँकर चालकांची यादी तयार करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, तसेच महापालिका आयुक्तांनाही त्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर असताना टॅँकरवाल्यांकडून पाचपट जादा दराने पैसे घेणे योग्य नाही. मूळ दरापेक्षा १00-२00 रुपये जादा देण्याची मानसिकता असताना नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.- महेश देसाई, नागरिक

पूर परिस्थितीमुळे गेले १५ दिवस पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल झाले. प्रशासनाकडे असलेल्या टँकरच्या संख्येत मर्यादा असल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला; मात्र टँकरमालकांनी याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दर लावून नागरिकांची लूट केली आहे.- करुणा कांबळे, गृहिणी 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरWaterपाणी