आमदार निधीतील पैसे फसवणूक प्रकरणी साताऱ्यातील एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 18:12 IST2018-11-22T17:40:22+5:302018-11-22T18:12:18+5:30
आमदार निधीतून पैसे देतो असे सांगून २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २१) रात्री गुन्हा

आमदार निधीतील पैसे फसवणूक प्रकरणी साताऱ्यातील एकावर गुन्हा
कोल्हापूर : आमदार निधीतून पैसे देतो असे सांगून २१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताºयातील एकावर कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २१) रात्री गुन्हा दाखल झाला.
दिनेश मधुकर दीक्षित (रा. प्लॉट नंबर २, मंगेशकर कॉलनी, अर्कशाळानगर, शाहूपुरी, सातारा, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद उचगाव (ता. करवीर) येथील अजितेश रामराव यादव (वय १९, रा. मंगेशकर कॉलनी, मेन रोड) यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, अजितेश यादव व संशयित दिनेश दीक्षित हे दोघे मित्र आहेत.
दीक्षितने आमदार निधीतून पैसे देतो म्हणत अजितेशचा विश्वास संपादन केला. या निधीतील रक्कम ट्रान्स्फर करावयाची आहे, असे सांगून त्याने अजितेश यादवकडून लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बॅॅँकेचे ए. टी. एम. कार्ड घेतले. त्याच्या खात्यावरील २१ हजार ५०० रुपये काढून घेतले. हा प्रकार १३ ते १८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजितेश यादवने फिर्याद दिली. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली आहे.