Crime of both networking marketing for inducing husband to commit suicide | पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर गुन्हा

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर गुन्हा

ठळक मुद्देपतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर गुन्हा पत्नीची पोलिसांत तक्रार : दागिने विकून केली होती कंपनीत गुंतवणूक

कोल्हापूर : नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक झाल्याने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबद्दल कंपनीच्या दोघांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कृष्णात प्रकाश गोंड (३३, रा. खोतवाडी, पो. माजगाव, ता. पन्हाळा) व किरण कांबळे-देसाई (रा. माजगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसुर्ले येथील युवराज बाळू माने यांनी ७ नोव्हेंबर २०२० रोजी कोल्हापुरात शाहुपुरीतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी मृत माने यांच्या पत्नी अर्चना युवराज माने (२८, रा. आसुर्ले) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली.

मृत युवराज माने यांनी पत्नीचे दागिने विकून ते पैसे नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास कृष्णात गोड व किरण कांबळे-देसाई यांंनी भाग पाडले. त्यानंतर मानेंना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी अर्चना माने यांनी पोलिसांत केला. त्यानुसार शाहुपुरी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Crime of both networking marketing for inducing husband to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.