Kolhapur: कळे येथे स्मशानात करणी, ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:37 IST2025-06-13T18:36:49+5:302025-06-13T18:37:53+5:30

कळे: येथील स्मशानभूमीत करणीसदृश प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. याप्रकरणी संबंधित मांत्रिक व युवकांवर कारवाईची मागणी ...

Crime at a graveyard in Kale kolhapur, villagers march to the police station | Kolhapur: कळे येथे स्मशानात करणी, ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

Kolhapur: कळे येथे स्मशानात करणी, ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

कळे: येथील स्मशानभूमीत करणीसदृश प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. याप्रकरणी संबंधित मांत्रिक व युवकांवर कारवाईची मागणी करत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी थेट कळे पोलिस ठाण्यावर मोर्चा वळवला.

पौर्णिमेच्या रात्री एका वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने रात्री उशिरा काही नागरिक अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी स्मशानशेडमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे ६ ते ७ युवक एका ठिकाणी बसून करणी, भानामतीसदृश प्रकार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे नागरिक तिथे पोहोचताच संबंधित युवकांनी अंधाराचा आणि आजूबाजूच्या शेतवस्तीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

स्मशानशेडमध्ये पाहणी केली असता, लिंबू, केळी, गहू, नाचणी, उर्दू भाषेतील मुलींची नावे असलेल्या चिठ्ठ्या आणि काही मुलींचे छायाचित्रे अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्या. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. करणीप्रकरणावरून संताप व्यक्त करत थेट कळे पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. संबंधित शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली. त्यामुळे याप्रकरणाशी निगडित युवकांना चौकशीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही उपस्थित राहिले नाही. दिवसभर पोलिस ठाण्यावर नागरिकांची मोठी गर्दी होती.

Web Title: Crime at a graveyard in Kale kolhapur, villagers march to the police station