शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक

By admin | Updated: July 5, 2015 01:09 IST

दाभोळकर कॉर्नर येथील घटना : दमदाटी करून रिक्षाही नेली

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथे चालकाला दमदाटी करून त्याची हौदा रिक्षा लंपास करून वीस हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शनिवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी किरण दड्डाप्पा माने (वय रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजी पार्क) असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ किशोर हा फरार असून, दोघांनाही तडिपार करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्ष्मण रोहिदास आयरे (३२, रा. साळोखे पार्क) हे आपल्या भाडोत्री व्यवसायाकरिता असलेल्या हौदा रिक्षा (एमएच ०९ सीयू २६१६) मधून सदर बझार येथील भाडे सोडून दाभोळकर कॉर्नर येथे येऊन थांबले. दरम्यान, शेजारील गाडीवर ते चहा पिण्यासाठी गेले असता संशयित किरण माने व त्याचा भाऊ किशोर माने या दोघांनी त्याठिकाणी येऊन आयरे यांना नाव, पत्त्याबाबत विचारणा करीत दमदाटी केली. यावेळी त्यांच्या हातातील चावी हिसकावून घेत रिक्षा घेऊन गेले. यावेळी जाताना त्यांनी रिक्षा हवी असेल, तर वीस हजार रुपये घेऊन विक्रम हायस्कूलच्या शेजारील मैदानावर येण्यास सांगितले. त्यानंतर याप्रकरणी आयरे यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विलास भोसले व त्यांच्या सहकार्यांनी संंशयित किरण माने याला महालक्ष्मी नगर, कदमवाडी परिसरात फिरताना अटक केली. त्यांच्याकडून अ‍ॅपे रिक्षाही जप्त केली. त्याचा भाऊ किशोर पसार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. (प्रतिनिधी)