शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कोटींच्या बनावट टीडीआरप्रकरणी गुन्हा

By admin | Updated: July 18, 2015 01:07 IST

महापालिका वर्तुळात खळबळ : सानेगुरुजी वसाहतीतील क्रीडांगणाची जागा

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरातील आरक्षित क्रीडांगणाची दोन एकर जागा दाखवून पाच एकरांचा टीडीआर (हस्तांतर विकसन हक्क) घेतल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा धैर्यशील पांडुरंग यादव (रा. एमएलजी शाळेजवळ, भवानी मंडप) या संशयितावर गुन्हा दाखल झाला. संशयित यादवने कोल्हापूर महापालिकेला खोटी माहिती सादर केली. याबाबतची फिर्याद नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुणकुमार दत्तात्रय गवळी (रा. प्लॉट नंबर १०, मधुमालती अपार्टमेंट, शुगरमिल) यांनी दिली. दरम्यान, सध्याच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत सुमारे नऊ कोटी रुपये होते.याबाबत पोलिसांनी सांगितले की, सानेगुरुजी वसाहत परिसरातील रि.स.नं. १०१०/१ पैकी क्रीडांगणासाठी आरक्षण क्रमांक २९३ आहे. या जागेचे वटमुखत्यारधारक संशयित धैर्यशील यादव आहे. यादवने ही जागा नऊ हजार ९०० चौरस मीटर असताना ती एक लाख ९० हजार ६० चौरस मीटर आहे, अशी खोटी माहिती महापालिकेच्या नगररचना विभागाला सादर केली. दरम्यान, दोन-तीन वर्षांपूर्वी जादा टीडीआर दिल्याचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश केल्यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. शेटे यांनी याबाबतची संपूर्ण माहिती तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना दिली होती. चार महिन्यांपूर्वी बिदरी यांची बदली झाली. राजारामपुरी येथील नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुणकुमार गवळी यांनी तपास केला असता संशयित यादवने खोटी माहिती सादर करून जास्त टीडीआर घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी रात्री संशयित धैर्यशील यादव याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार यादवविरोधात भारतीय दंडविधान संहिता ‘कलम १७६’ कलमानुसार गुन्हा दाखल केला. यादव हा बिल्डर असल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमृत देशमुख करत आहेत. (प्रतिनिधी)जादा टीडीआर रद्दप्रत्यक्षात दोन एकरांचा टीडीआर द्यायचे बंधनकारक असताना तो पाच एकरांचा दिल्याचे कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी लक्षात येताच त्यांनी हा टीडीआरच रद्द केला.तीन वर्षांपूर्वी सानेगुरुजी वसाहतीतील आरक्षित क्रीडांगणाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल झाल्याने यश आले.- भूपाल शेटे, नगरसेवक, कोल्हापूर महापालिका.