जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी हनिमनाळच्या एका विरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 15:07 IST2021-07-31T15:05:55+5:302021-07-31T15:07:24+5:30
Crimenews Gadhinglaj Kolhapur : जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एका विरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शिवानंद भीमगोंडा पाटील (रा. हनिमनाळ ता. गडहिंग्लज )असे संशयित आरोपीचे नाव आहे.

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी हनिमनाळच्या एका विरुद्ध गुन्हा
गडहिंग्लज : जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एका विरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शिवानंद भीमगोंडा पाटील (रा. हनिमनाळ ता. गडहिंग्लज )असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी हनिमनाळ (ता. गडहिंग्लज ) येथील सुरेश मारूती लोखंडे आणि शिवाजी यमनाबाई लोखंडे यांच्यात जमीनीच्या वाटणीवरून वाद आहे.
दरम्यान,२१ जुलै २०२१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास सुरेश हा मोटरसायकलवरून गडहिंग्लजला येत होता.त्यावेळी शेंद्रीरोडवरील आयटीआयसमोर शिवानंद यांने आपली मोटरसायकल आडवी मारून 'तू शिवाजीला का त्रास देतोस 'असे म्हणत सुरेशला
जातीवाचक शिवीगाळ केली व लोखंडी रॉडने त्याच्या पाठीवर मारहाण केली.
सुरेश लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.डीवायएसपी गणेश इंगळे अधिक तपास करीत आहेत.