विचारेमाळ येथे हाणामारी, बारा जणांवर गुन्हा, परस्परविरोधी फिर्यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 16:48 IST2019-05-07T16:47:30+5:302019-05-07T16:48:45+5:30

किरकोळ कारणावरून विचारेमाळ येथील पंढरपूर गल्ली येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी बारा जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. ६ मे रोजी हा प्रकार घडला.

Crashing at Vicharemal, crime against 12 people, conflicting plaintiffs | विचारेमाळ येथे हाणामारी, बारा जणांवर गुन्हा, परस्परविरोधी फिर्यादी

विचारेमाळ येथे हाणामारी, बारा जणांवर गुन्हा, परस्परविरोधी फिर्यादी

ठळक मुद्देविचारेमाळ येथे हाणामारी, बारा जणांवर गुन्हापरस्परविरोधी फिर्यादी

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून विचारेमाळ येथील पंढरपूर गल्ली येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी बारा जणांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. ६ मे रोजी हा प्रकार घडला.

नीलम सगट (वय २७, सध्या रा. विचारेमाळ, मूळ रा. योगेश्री कॉलनी, पाचगाव रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दारूच्या पैशासाठी झालेल्या कारणावरून दादू सगट आणि संशयितांचा वाद झाला. संशयितांनी काठीने सगट याच्यासह त्याचा मामेभाऊ सूरज लक्ष्मण कांबळे, त्याची बहीण अंकिता यांना केलेल्या मारहाणीत त्या जखमी झाल्या.

याप्रकरणी रसूल सय्यद, रियाज सय्यद, कैलास शिंदे, सूजी सय्यद, मुलताना सय्यद, सुगरा शेख (सर्व रा. विचारेमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. रसूल सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पायी चालत जात असताना संशयित सहाजणांनी मारहाण केली.

संशयित सूरज कांबळे याने सत्तुराने डोळ्यांजवळ वार केला. याप्रकरणी संशयित सूरज कांबळे, दादू सगट, पपन सगट, बायनाबाई सगट, ललिता कांबळे, अंकिता कांबळे (सर्व रा. पंढरपूर गल्ली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Crashing at Vicharemal, crime against 12 people, conflicting plaintiffs