नेत्रदान पंधरवडानिमित्त ‘सीपीआर’तर्फे शहरातून जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:40 PM2019-08-26T16:40:47+5:302019-08-26T16:49:27+5:30

कोल्हापूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती सी. पी. आर. व ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळातर्फे ३४ वा नेत्रदान पंधरवडानिमित्त सोमवारी सकाळी शहरातून नेत्रदान जनजागृती फेरी काढण्यात आली, यामध्ये अंध मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीत ‘नेत्रदान हेच श्रेष्ठदान’च्या घोषणा देण्यात आल्या.

CPR rounds up the awareness through fortnightly 'CPR' | नेत्रदान पंधरवडानिमित्त ‘सीपीआर’तर्फे शहरातून जनजागृती फेरी

नेत्रदान पंधरवडानिमित्त ‘सीपीआर’तर्फे कोल्हापूर शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.

Next
ठळक मुद्देनेत्रदान पंधरवडानिमित्त ‘सीपीआर’तर्फे कोल्हापूरातून जनजागृती फेरी ‘नेत्रदान श्रेष्ठदान’च्या घोषणा

कोल्हापूर : जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती सी. पी. आर. व ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळातर्फे ३४ वा नेत्रदान पंधरवडानिमित्त सोमवारी सकाळी शहरातून नेत्रदान जनजागृती फेरी काढण्यात आली, यामध्ये अंध मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीत ‘नेत्रदान हेच श्रेष्ठदान’च्या घोषणा देण्यात आल्या.

या जनजागृती फेरीचे उद्घाटन रा. छ. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजीत लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक बी. सी. केम्पीपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी, अंध मुलांच्या आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश बोंद्रे होते. त्यांनी संस्थेची माहिती विशद केली. दैवज्ञ बोर्डिंग येथून शाळेच्या आवारातून या फेरीला प्रारंभ झाला. ही फेरी खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी येथून पुन्हा शाळेत आली.

या फेरीत अंध शाळेतील विद्यार्थ्यांसह सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरुळकर, नेत्रविभागप्रमुख डॉ. अतुल राऊत, वैद्यकीय अधिकारी एस. के. अजेटराव, सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिजित ढवळे, एस. व्ही. चोकाककर, विनायक सुतार, शंकर काशीद, संस्थेचे संचालक डॉ. सुहास बोंद्रे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुप्रिता घोरपडे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. अंधशाळेचे मुख्याद्यापक प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

नेत्रदान पंधरवडानिमित्त जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती सी. पी. आर. व अंधशाळातर्फे सोमवारी काढलेल्या नेत्रदान जनजागृती फेरीचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजीत लोकरे व जिल्हाशल्यचिकित्सक बी. सी. केम्पीपाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. एस. के. अजेटराव, डॉ. अतुल राऊत, डॉ. अभिजित ढवळे, प्रकाश बोंद्रे, प्रकाश पाटील, सुहास बोंद्रे, आदी उपस्थित होते.
-----------------
तानाजी

 

Web Title: CPR rounds up the awareness through fortnightly 'CPR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.