व्हन्नुर फाटयानजीक अपघात, केनवडेतील दोघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 13:22 IST2022-03-12T13:19:25+5:302022-03-12T13:22:46+5:30
अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावर पळ काढला

व्हन्नुर फाटयानजीक अपघात, केनवडेतील दोघे जागीच ठार
म्हाकवे : कागल-निढोरी मार्गावरील व्हन्नुर फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत केनवडे (ता.कागल) येथील चुलता-पुतण्या जागीच ठार झाले. बापूसाहेब यशवंत तळेकर (वय-५२) व सुरेश दिनकर तळेकर (२३) अशी मृत दोघांची नावे आहेत. दोघे हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याचे कर्मचारी होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काम आटपून कारखान्याहून तळेकर हे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. यावेळी व्हन्नुर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस समोरुन जोराची धडक दिली. यामध्ये ते दोघेही जागीच ठार झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावर पळ काढला. या अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.