शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा"; दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 12:47 IST

Sucide Kolahpur : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात १३ वर्षाच्या मुलासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपन्हाळा तालुक्यातील दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्यासामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ

 कळे/कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात १३ वर्षाच्या मुलासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. कळे परीसरात शोककळा पसरली आहे.  जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली आहे. 

पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील दिपक शंकर पाटील (वय ४०), वैशाली दिपक पाटील (वय ३५) आणि विघ्नेश दिपक पाटील (वय १४) या तिघांचे मृतदेह येथील कुंभी नदीपात्रात सापडले. आई आणि वडिलांनी चौदा वर्षाच्या मुलाला मध्ये घेउन नदीत उडी टाकून ही आत्महत्या  केल्याचे  सकाळी उघडकीस आले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातून गुरुवारी रात्री ११ नंतर हे दाम्पत्य बाहेर पडले होते .  गोठे (ता. पन्हाळा) येथील हे दाम्पत्य दोन मुले, वडील एकूण  ५ जणसह एकत्र  राहत होते.‌  गुरूवारी  मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी गोठे जवळील पाण्याच्या  वाटेने चालत जाऊन कुंभी नदीत उडी  घेऊन आत्महत्या केली. पात्राजवळ तिघांनी एकत्र  दोरीने  बांधुन घेतले. सकाळी घराला बाहेरुन कडी असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी घर उघडले असता त्यांना मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यानंतर गावक-यांनी शोधाशोध केली असता त्यांना कुंभी नदी पात्राजवळ त्यांची चप्पले आढळुन आली. नदी पात्रात शोधाशोध केली असता तिघांचे एकत्र  दोरीने बांधलेले मृतदेह आढळुन आले.  

सकाळी ९ च्या सुमारास मृतदेह  नदीपात्रातुन  बाहेर काढण्यात आले. या  दाम्पत्याची इ. १०  वीच्या वर्गात  शिकत असणारी कन्या साक्षी दिपक पाटील ( वय १६ )  ही आपल्या आजोळी  चिंचवडे ( ता. करवीर ) गावी गेल्याने या घटनेतुन वाचली असल्याची चर्चा गावक-यात होती. जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्याजीवनात अयशस्वी  ठरलो, आम्हाला  माफ करा, कोणालाही जबाबदार धरु नये. प्रदीप घराकडे लक्ष ठेव. संजु, आक्का, अमर, आण्णाला  सांभाळा. कोणीही  तक्रार  करु नये, मी, वैशाली व  विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. सर्ज्यादा व दिपक, माफ करा, चुकलो. अशा मजकुराची  चिठ्ठी घरी मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर