शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार

By admin | Updated: April 7, 2017 01:05 IST

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समिती नेमून संपूर्ण योजनेची चौकशी करावी, तसेच भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी केले.दरम्यान, या जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी इन्कार केला; पण या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ६९ गावांत सुमारे ३० कोटींचा निधी खर्च पडून १२०९ कामे केली, पण बहुतांश कामे निरुपयोगी, निकृष्ट, पाणी न अडविणारी झाल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने केला. शेततळी केली असली तरीही पाणी साठत नाही. काही तळी आणि माती नाला बांध आत्ताच मातीने भरले आहेत. कामे घाईत उरकून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केला.या कामाच्या आधारे कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने पाणीसाठा निर्मिती झाली आहे, असे दाखविले; पण प्रत्यक्षात खोटा अहवाल दिला आहे. हे अभियान राबविताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, दरवर्षी पाणीटंचाईचा होणारा आराखडा, भूजल पातळी याचा विचार केला नाही. जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचाही आरोप करण्यात आला.या शिष्टमंडळात शहरप्रमुख दुर्गेश लिग्रस, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, राजू सांगावकर, सुनील पोवार, संभाजीराव भोकरे, संजय जाधव, दिलीप देसाई, प्रसाद आडनाईक, प्रवीण सावंत, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)