CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:36 IST2020-05-13T17:35:23+5:302020-05-13T17:36:37+5:30
देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती.

CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात
बेळगाव : देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे अल्पकाळ बेळगावरेल्वे स्टेशनवर थांबली होती.
हुबळीत अडकून पडलेल्या राजस्थानमधील कामगार,व्यापारी,विद्यार्थी यांना घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर आलेली श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाली उतरण्यास परवानगी नव्हती.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर कोणीही उतरले नाही.
प्रवाशांनी रेल्वेतूनच माध्यमांशी संवाद साधला.आपल्या गावी पोचवण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल प्रवाशांनी रेल्वे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले. जोधपूरला आपल्या गावी निघालेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.