शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

CoronaVirus Lockdown : राजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणार-पालकमंत्री सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 11:06 AM

राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

ठळक मुद्देराजस्थान शासनाकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणारपालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर - राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी ३४ हजार ३६२ जणांनी तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १७ हजार ४२ अशा एकूण ५१ हजार ४०४ जणांनी आनलाईन नोंद केली आहे, असे सांगून पालकमंत्री  पाटील म्हणाले, राजस्थानमधील एकूण १७०० कामगार जिल्ह्यात आहेत.

रेल्वेच्या क्षमतेनुसार ११९७ कामगारांची यादी काल रात्री राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आली आहे. अद्याप परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास कोल्हापुरातून रेल्वेने या कामगारांना राजस्थानकडे पाठविण्यात येईल.त्याच पद्धतीने बिहारमधील २१६५ कामगारांनीही आनलाईन अर्ज केले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्या परवानगीसाठीही बिहार शासनाला संपर्क केला जाईल.गेले दीड महिना कोल्हापूरकरांनी अत्यंत चांगला पद्धतीने सहकार्य केले आहे. तशाच पद्धतीने इथून पुढेही लाकडाऊनमध्ये सहकार्य करावे. बाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणार असून तसे नियोजन केले आहे. निकषानुसार ज्यांची घरात रहायची व्यवस्था नाही त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणार आहोत. तशा सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.परवानगीने जे लोक जिल्ह्यात येत आहेत, त्यांनी दक्षता बाळगणं आवश्यक आहे. थोडी जरी लक्षणं दिसली तरी ताबडतोब प्रशासनाला कळवा. किमान १५ दिवस कुणालाही भेटू नये. घरी अलगीकरणात असताना जर बाहेर फिरताना आढळल्यास त्याला सक्तीने संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.मुंबई-पुणे रेड झोनमध्ये असल्याने तेथून येणाऱ्यांच्या बाबतीत अजून निर्णय झाला नाही. जर तेथे व्यवस्था असेल तर थोडे दिवस तेथेच थांबावे, असे आवाहन करुन पालकमंत्री म्हणाले, कोणताही प्रादूर्भाव आपल्या जिल्ह्यात, गावाकडं होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणं आवश्यक आहे.

आजपर्यंत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. प्रशासनानेही दोन पावले पुढं जावून चांगल्या पद्धतीची सहकार्याची भूमिका घेतली आहे. १७ तारखेपर्यंत अजून लाकडाऊन आहे. आतापर्यंत जसे सहकार्य दिलेत तसेच ते पुढेही ठेवा. अनावश्यक गर्दी टाळा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेवटी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर