CoronaVirus Lockdown : राज्याबाहेर जाणाऱ्या, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची संख्या ४२ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:59 IST2020-05-16T15:58:23+5:302020-05-16T15:59:15+5:30
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या, राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ४२३९३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून जिल्ह्यात येणाऱ्या १९०८९ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

CoronaVirus Lockdown : राज्याबाहेर जाणाऱ्या, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची संख्या ४२ हजार
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या, राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ४२३९३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून जिल्ह्यात येणाऱ्या १९०८९ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ४२३९३ व्यक्तींमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या ४१०९४, तर राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या १२९९ व्यक्तींचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या १९०८९ व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या ११३९५, तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या ७६९४ व्यक्तींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.