शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

CoronaVirus Lockdown : व्हाईट आर्मी अन्नछत्रकडून कामगारांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 2:03 PM

कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठराशेहून अधिक कामगारांना जेवण देण्यात येत आहे. हे अन्नछत्र चालविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देव्हाईट आर्मी अन्नछत्रकडून कामगारांना जेवणआजवर १८०० जणांना लाभ : मदतीचे आवाहन

कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कोल्हापुरातील कामगारांची भूक व्हाईट आर्मी अन्नछत्राच्या वतीने भागविली जात आहे. संस्थेतर्फे हनुमाननगर, रामनगर, शिये फाटा, नागाव फाटा, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, तामगाव येथील अठराशेहून अधिक कामगारांना जेवण देण्यात येत आहे. हे अन्नछत्र चालविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन असल्याने हातावरचे पोट असलेल्या कामगारांवर संक्रांत आली आहे. काम बंद आहे. त्यातच हे कामगार आपल्या गावीही जाऊ शकत नाहीत, अशी दुहेरी अडचण आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात येताच गजेंद्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे व कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यातून व्हाईट आर्मी संस्थेने अन्नछत्र उभारले आहे. याद्वारे या सर्व कामगारांना त्यांच्या राहत्या घरी व थांबलेल्या ठिकाणी जाऊन दोनवेळचे जेवण दिले जात आहे.या काळात वाहनाची सोय नसल्याने अनेक कामगार मैलोन्मैलांचा प्रवास पायी करीत आपापल्या गावी परतत आहेत. अशा कामगारांना तसेच शिरोली ते कोगनोळी टोलनाका, संकल्प सिद्धी कार्यालयाशेजारी, जीवबा नाना जाधव पार्क, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर तसेच फुलेवाडी रिंग रोड ते रंकाळा परिसरात झोपड्या तयार करून राहत असलेल्या कुटुंबांनाही दोनवेळचे जेवण पुरविले जात आहे.

यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित संशयित रुग्णांच्या नातेवाइकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. अशा रीतीने आजवर अठराशेहून अधिक लोकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे.

अडकून पडलेल्या कामगारांना जेवण पुरविण्यासाठी व्हाईट आर्मीचे १०० महिला व पुरुष जवान सकाळपासून रात्रीपर्यंत राबत आहेत. अन्नछत्र चालविण्यासाठी धान्यस्वरूपात अथवा रोख स्वरूपात सहकार्याची गरज आहे, त्यासाठी दानशूरांनी पुढाकार घ्यावा. यासाठीचा निधी व्हाईट आर्मी रिलीफ फंड बॅँक आॅफ महाराष्ट्र खाते क्र. ६०३४१७७२०४१, आयएफसी कोड - एमएएचबी ०००११३० या खात्यावर जमा करावा.- अशोक रोकडे,अध्यक्ष, व्हाईट आर्मी

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर