CoronaVirus : अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ : अमन मित्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 15:08 IST2020-06-05T15:06:22+5:302020-06-05T15:08:02+5:30

ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

CoronaVirus: Benefits of Employment Guarantee Scheme for Unskilled Handicapped: Information by Aman Mittal | CoronaVirus : अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ : अमन मित्तल

CoronaVirus : अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ : अमन मित्तल

ठळक मुद्देअकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ अमन मित्तल यांची माहिती

कोल्हापूर : ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोव्हिड-१९च्या संचारबंदीच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम चालविला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अशा अकुशल दिव्यांगांनी त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार व कुशलतेप्रमाणे रोजगार हमी योजनेबाबत जॉब कार्ड तयार करून घेण्यासाठी गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. याबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही मित्तल यांनी केले आहे.

 

Web Title: CoronaVirus: Benefits of Employment Guarantee Scheme for Unskilled Handicapped: Information by Aman Mittal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.