शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : समरजित घाटगे : सीपीआरला दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.

येथील सीपीआर रुग्णालयाला त्यांनी भेट दिली व जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती घेतली. आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, बंटी सावंत, आदी उपस्थित होते.

शाहू ग्रुपमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. शाहू साखर कारखान्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवरही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवू, असे घाटगे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माळी म्हणाले, दुसऱ्या लाटेमध्ये ज्या ठिकाणी पूर्वी कमी संसर्ग होता, त्या ठिकाणी आता जास्त संसर्ग आहे व तरुण वर्गामध्ये तो मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिबंधक लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये पाचव्या क्रमांकावर असून, ४६ टक्केपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेऊन पूर्ण खबरदारी घेऊन पूर्वतयारी केली आहे.

मदतीसाठी ‘शाहू’ अग्रेसर

भविष्यातील धोका ओळखून सहा महिन्यांपूर्वीच शाहू कारखान्यावर कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. परवाच कारखान्यामार्फत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. याशिवाय आरोग्य सेवेसाठी आणखी काही मदत लागल्यास सूचना करा, अशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीमध्ये ‘शाहू’ नेहमीच अग्रेसर आहे, अशी प्रतिक्रिया देताच घाटगे यांनी नम्रपणे हात जोडून त्यांचे आभार मानले.

फोटो : १९०४२०२१-कोल-समरजित घाटगे भेट

कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल धुमाळ व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मदतीबाबत सोमवारी चर्चा केली.