साई मंदिर गारगोटीच्यावतीने कोरोना योध्दांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:11+5:302021-02-05T06:59:11+5:30

गारगोटी : येथील श्री साई मंदिर समितीच्यावतीने पंचक्रोशीतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ८५ कोरोना ...

Corona warriors felicitated on behalf of Sai Mandir Gargoti | साई मंदिर गारगोटीच्यावतीने कोरोना योध्दांचा सत्कार

साई मंदिर गारगोटीच्यावतीने कोरोना योध्दांचा सत्कार

गारगोटी : येथील श्री साई मंदिर समितीच्यावतीने पंचक्रोशीतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ८५ कोरोना योद्ध्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. श्री मौनी विद्यापीठ यांनी आपल्या इमारती व कोविड सेंटरला अद्ययावत जी. टी. सी. सेंटर उपलब्ध करून दिल्याबद्दल मौनी विद्यापीठाचा कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांनी हा सत्कार स्वीकारला. गारगोटी ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा फेटा, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गारगोटी ग्रामपंचायतीला मानपत्र देण्यात आले. सरपंच संदेश भोपळे यांनी हा सत्कार स्वीकारला. भुदरगड पोलीस ठाणे यांनी कोरोना कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार मानपत्र देऊन करण्यात आला. हा सत्कार भुदरगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयेकर यांनी स्वीकारला. वेंकटेश्वरा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी, पंचक्रोशीतील आशा सेविका, परिचारिका, अंगणवाडी सेविका, महसूलचे कर्मचारी राजन शिंदे, जी. टी. सी. कोविड सेंटरचे सर्व कर्मचारी आणि सहयोग फाऊंडेशनने दीड लाख बुस्टर वाटल्याबद्दल त्यांनाही मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कार समारंभाला डॉ. भगवान डवरी, डॉ. आर. डी. बेलेकर, डॉ. सुरेश कडव, चंद्रकांत गोजारे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, डॉ. उदय शिंदे, सुनील हिरेमठ, बाळासाहेब एकल, रामचंद्र सनगर, महेश फुटाणकर, हेमंत देसाई उपस्थित होते.

Web Title: Corona warriors felicitated on behalf of Sai Mandir Gargoti