corona virus :जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचीच वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 10:56 IST2020-07-28T10:55:13+5:302020-07-28T10:56:17+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले.

corona virus :जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचीच वर्दळ
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यानंतर एक ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर पदाधिकाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर गेले १५ दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नव्हते. मधल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांवर आणण्यात आली होती.
अशातच लाकडाऊन असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यही इकडे फिरकत नव्हते. लाकडाऊन शिथिल केल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत गर्दी होईल अशी अटकळ होती. मात्र, कर्मचारी १०० टक्के उपस्थित होते. अध्यक्ष बजरंग पाटील आणि समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी काही काळ हजेरी लावली.