corona virus : जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 10:30 IST2020-11-27T10:28:59+5:302020-11-27T10:30:33+5:30
coronavirus, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात सध्या साडेचारशे कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २६ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने एकाही मृत्यूची घटना घडली नाही.

corona virus : जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या साडेचारशे कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २६ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सुदैवाने एकाही मृत्यूची घटना घडली नाही.
जिल्ह्यात अलीकडे रुग्णसंख्या कमी झाली असून केवळ तीस ते चाळीसच्या आतच नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे रुग्णालयावरील ताण प्रचंड कमी झाला आहे. गेल्या चोवीस तासांत कोल्हापूर शहरात ११ तर शिरोळ व करवीर तालुक्यात प्रत्येकी तीन, आजरा तालुक्यात दोन नवीन रुग्णांची नोंद झाली.
आतापर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ९९२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ४६ हजार ८३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे केवळ ४५० रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.