corona virus : ऑक्सीजन पुरवठा जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:23 IST2020-09-13T14:20:39+5:302020-09-13T14:23:59+5:30
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.

corona virus : ऑक्सीजन पुरवठा जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमकडे
कोल्हापूर: कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी राज्य शासनामार्फत उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला ऑक्सिजन पुरवठ्या संदर्भातील अडचणी सोडवणूक करणेसाठीची जबाबदारी देण्यात आली आहे. कंट्रोल रूम 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू ठेवणेत येणार आहे.
कंट्रोल रूमला ऑक्सिजन संबंधीत ज्या तक्रारी प्राप्त होतील, त्या तक्रारीसाठी एक स्वतंत्र नोंदवही ठेवणेत येणार आहे. दिनांक 11 सप्टेंबर 2020 च्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या समितीतीत नेमणेत आलेल्या अधिकारी यांना त्यांचे कार्य क्षेत्रातील तक्रारी कळविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठ्या संदर्भात येणाऱ्या तक्रारी व मागणी याबाबत जिल्ह्यातील कंट्रोल रूमचे संपर्क अधिकारी यांनी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील कंट्रोल रूमचे संपर्क क्रमांक
- 0231-2659232, 0231-2652950, 0231-2652953, 0231-2652954
- टोल फ्री क्रमांक 1077
- कंट्रोल रूमना काही अडचण असल्यास त्यांनी संपर्क साधावा.
- दुरध्वनी क्र. 022-6592364
- टोल फ्री क्रमांक 1800222365