corona virus :कोल्हापूर शहरातील २९ हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:39 IST2020-07-07T11:38:31+5:302020-07-07T11:39:26+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने शहरात सर्वेक्षण मोहिम सुरु आहे. चौथ्या टप्यात मोहिमेमध्ये सोमवारी ६ हजार ८८६ घरांचे सर्वेक्षण केले असून २९ हजार ४० नागरीकांची तपासणी केली.

corona virus :कोल्हापूर शहरातील २९ हजार नागरिकांची तपासणी
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने शहरात सर्वेक्षण मोहिम सुरु आहे. चौथ्या टप्यात मोहिमेमध्ये सोमवारी ६ हजार ८८६ घरांचे सर्वेक्षण केले असून २९ हजार ४० नागरीकांची तपासणी केली.
यामध्ये कणेरकर नगर, तामजाई कॉलनी, राजे संभाजीनगर, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, लोणार वसाहत, टाकाळा, कॉमर्स कॉलेज, सुर्वेनगर, जीवबा नाना पार्क, नाळे कॉलनी, मोरे-माने नगर, रामानंद नगर, जरगनगर, सुभाषनगर, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, नागाळा पार्क, लाईन बाजार, बावडा, जवाहर नगर, सरनाईक वसाहत या परिसराच समावेश आहे. आतापर्यंत चौथ्या टप्यामध्ये पाच लाख १७ हजार ७९७ नागरिकांची तपासणी केली आहे.