corona virus : सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:37 IST2020-07-25T12:37:06+5:302020-07-25T12:37:53+5:30

एलसीबी विभागातील आणखी दोन, तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एक व इचलकरंजीतील एक अशा आतापर्यंत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.

corona virus: Corona infection in six police personnel | corona virus : सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

corona virus : सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देसहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणजिल्हा पोलीस दलात खळबळ

कोल्हापूर : एलसीबी विभागातील आणखी दोन, तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एक व इचलकरंजीतील एक अशा आतापर्यंत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.

हातकणंगले, शाहूवाडीपाठोपाठ ह्यएलसीबीह्णत कोरोनाचा प्रवेश झाला. चार दिवसांच्या कालावधीत एलसीबीतील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. त्यांना तातडीने अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. इतरांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

एलसीबीतील अधिकारी व कर्मचाऱी दक्ष राहून व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.

Web Title: corona virus: Corona infection in six police personnel