शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

corona virus : दिलासादायक; जिल्ह्यातील रुग्ण, मृत्युसंख्या घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:20 AM

कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या काहीशी घटते आहे, ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी २४ तासांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५८४, तर मृत्युसंख्याही २१ पर्यंत आली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत घटलेली रुग्णसंख्या ही समाधानकारक बाब आहे. दिवसभरात कोल्हापूर शहरात सायंकाळपर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला; तर इचलकरंजी शहरात सुदैवाने एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही.

ठळक मुद्देदिलासादायक; जिल्ह्यातील रुग्ण, मृत्युसंख्या घटतेयनवे ५८४ रुग्ण : ५२२ जणांना डिस्चार्ज; दिवसभरात २१ मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या काहीशी घटते आहे, ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी २४ तासांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५८४, तर मृत्युसंख्याही २१ पर्यंत आली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत घटलेली रुग्णसंख्या ही समाधानकारक बाब आहे. दिवसभरात कोल्हापूर शहरात सायंकाळपर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला; तर इचलकरंजी शहरात सुदैवाने एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही.गेले दोन महिने कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. रोज सरासरी ११०० ते १२०० रुग्णसंख्या, तर ३० ते ३५ मृत्युसंख्या अशी भीतिदायक परिस्थिती होती. या बिकट परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र राबत आहे. त्या मानाने गेल्या आठवडाभरात मृत्युसंख्या घटल्याचे दिसून आले नसले तरी रुग्णसंख्या मात्र काहीशी घटल्याचे दिसते. मात्र बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत ५८४ नव्या रुग्णांची नोंद झाली; तर जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५२२ जणांनी उपचाराअंती कोरोनाला हरवून, डिस्चार्ज घेऊन घर गाठले. कोल्हापूर शहरात दिवसभरात ११०, तर इचलकरंजी शहरात १३, करवीर तालुक्यात ८५, हातकणंगले ६५ अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

  • एकूण रुग्णसंख्या : ३६६५५
  • एकूण डिस्चार्ज संख्या : २४८०४
  •  एकूण मृत्युसंख्या : ११४४
  • सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १०७०७पॉझिटिव्ह ६६४० रुग्णांवर घरीच उपचार 

कोल्हापूर शहरात तब्बल ४६१९ पॉझिटिव्ह रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत; तर ग्रामीण भागात व नगरपालिका हद्दीतील सुमारे २०२१ पॉझिटिव्ह रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. अशा ह्या ६६४० रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसली तरीही त्यांचे स्राव पॉझिटिव्ह आले आहेत.कोल्हापुरात तिघांचा मृत्यू, तर इचलकरंजीत निरंककोल्हापूर शहरात राजारामपुरी, देवकर पाणंद आणि न्यू पॅलेस या तीन ठिकाणी कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले, तर गेले तीन महिने मृत्यूचे तांडव पाहिलेल्या इचलकरंजी शहरात बुधवारी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद नाही, ही समाधानकारक बाब आहे. याशिवाय होनीवडे (ता. आजरा), मरळी, चव्हाणवाडी, नवे पारगाव (ता. पन्हाळा), कळंबा (ता. करवीर), कबनूर, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), मुरगूड (ता. कागल), दानोळी (ता. शिरोळ), माजगाव, पंडेवाडी (ता. राधानगरी), कनाकवाडी (ता. भुदरगड), यशवंतनगर (ता. चंदगड), मुगळी, लिंगनूर (ता. गडहिंग्लज), मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा), निपाणी, कुरारगाव (कर्नाटक).जिल्ह्याचा आढावा...

  • पॉझिटिव्ह रेट - २४.०७
  • ॲक्टिव्ह केस रेट- २९.५७
  • रिकव्हरी रेट - ६७.३
  • मृत्यू रेट - ३.१
  • संपर्क ट्रेसिंग रेट-७.७०
  • टोटल टेस्ट- १४९८५६

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तालुकानिहाय आजरा - ६५२, भुदरगड - ८४०, चंदगड - ७८७, गडहिंग्लज- ८६९, गगनबावडा - १०२, हातकणंगले - ४१७४, कागल - १२७९, करवीर - ४११४, पन्हाळा -१३६४, राधानगरी - १००३, शाहूवाडी - ९००, शिरोळ - १९९५, नगरपालिका - ५८४३, कोल्हापूर शहर - ११४८६, इतर जिल्हे व राज्य- ३७.

  • एकूण रुग्ण ३६६५५, एकूण मृत्यू ११४४

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर