शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

corona virus : साडेचार लाखांचे बिल तक्रारीनंतर दीड लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 2:32 PM

प्रशासनाने कितीही बंधने घातली तरीही कोल्हापूरमधील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून प्रचंड पैसे उकळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देसाडेचार लाखांचे बिल तक्रारीनंतर दीड लाखावर खासगी रूग्णालयांची नफेखोरी चव्हाट्यावर

कोल्हापूर : प्रशासनाने कितीही बंधने घातली तरीही कोल्हापूरमधील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून प्रचंड पैसे उकळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंत्र्यांचे इशारे, अधिकाऱ्यांच्या नोटिसांना कचऱ्याची टोपली दाखवत या रुग्णालयांनी येणाऱ्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता धुलाईचा धंदा सुरूच ठेवल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.राजारामपुरीतील नामांकित रुग्णालयाने एका कोरोना रुग्णाचे एकूण बिल चार लाख ४७ हजार केले. आठ दिवस या रुग्णावर उपचार सुरू होते. या दरम्यान नातेवाइकांनी आठ दिवसांमध्ये एक लाख ७५ हजार रुपये उपचाराकरिता ॲडव्हान्स भरले होते; तर ४० हजार रुपये औषधांसाठी भरले होते. १३ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्याआधी रुग्णालयाने उर्वरित दोन लाख ३२ हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र इतकी रक्कम या रुग्णाच्या नातेवाईकांना भरणे शक्य नव्हते.अखेर या नातेवाइकांनी संयुक्त राजारामपुरीच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती दिली. एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचेही त्यांना सांगितले. पदाधिकारी दुर्गेश लिंग्रस, अनुप पाटील, कमलाकर जगदाळे, विनायक सूर्यवंशी, अमर निंबाळकर, संजय काटकर, धैर्यशील निंबाळकर, अविनाश माळी, मदन जाधव यांनी शासनाचे ऑडिटर येऊन त्यांनी बिल तपासल्याशिवाय हे प्रकरण न संपवण्याचा निर्धार केला.

प्रशासनातील लेखापरीक्षक रोकडे यांनी चार लाख ४७ हजारांची ही रक्कम एक लाख ६० हजारांवर आणली. त्यामुळे नातेवाइकांकडून जादा घेतलेले ५५ हजार रुपयेही रुग्णालयाला परत करावे लागले.यांच्यावर कारवाई होणार का ?बिलांची तपासणी झाल्याशिवाय रुग्णांच्या नातेवाइकांनी बिले अदा करू नयेत, असे आवाहन प्रशासन करीत आहे. मात्र रुग्णालयात पाय टाकताना लाख, दोन लाख भरल्याशिवाय आत घेत नाहीत, याचा जाब प्रशासन विचारणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.

केवळ इशारे देऊन भागणार नाही. ज्या रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत आता लूट केली आहे आणि ज्यांची बिले नंतर कमी झाली आहेत, त्यांच्यावर कोरोनाचे संकट संपल्यानंतर तरी कारवाई होणार नसेल तर मंत्री आणि प्रशासन यांचे इशारे केवळ हवेतील बुडबुडे राहणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलbillबिलkolhapurकोल्हापूर