नाकावाटे घ्यायची कोरोना लस कोल्हापुरात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:38 IST2023-11-01T12:37:42+5:302023-11-01T12:38:09+5:30

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत शासनाने १८ ते ५९ वयोगटांतील नागरिकांसाठी नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचे ...

Corona vaccine available in Kolhapur | नाकावाटे घ्यायची कोरोना लस कोल्हापुरात उपलब्ध

नाकावाटे घ्यायची कोरोना लस कोल्हापुरात उपलब्ध

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत शासनाने १८ ते ५९ वयोगटांतील नागरिकांसाठी नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचे प्रिकॉशन डोस उपलब्ध करून दिले आहे. हे डोस महापालिकेच्या राजारामपुरी येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक तीन येथे उपलब्ध आहेत. 

पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड अगर कोव्हॅक्सिनचा घेतला, तरी नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीचा प्रीकॉशन डोस घेण्यात यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन महापालिका आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Corona vaccine available in Kolhapur