शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

इचलकरंजी : गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा होय. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून, यास नैसर्गिक, आध्यत्मिक व ऐतिहासिक महत्त्व ...

इचलकरंजी : गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा होय. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून, यास नैसर्गिक, आध्यत्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचे महाभयंकर संकट असल्यामुळे गुढीपाडवा सणावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.

गुढीपाडव्यादिवशी वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू व सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असते. वस्त्रनगरीत यादिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खरेदीवर पुन्हा एकदा मर्यादा येत आहेत. कोरोनामुळे गतवर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले. काही दिवसांनी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत होती; पण सध्या पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्यावर्षी सण साजरा करता येत नसल्यामुळे व्यापारी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

गतवर्षीच्या कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. नागरिकांनी जी काही जमापुंजी केलेली होती, ती सर्व कोरोना काळात खर्च करण्यात आली. यावर्षीही लॉकडाऊन होणार, या भीतीपोटी ग्राहकांनी अत्यावश्यक वस्तू वगळता चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया

यावेळी परत लॉकडाऊन होणार असल्यामुळे कोणत्याही मोबाईल कंपन्यांनी ऑफर दिलेली नाही, तर गतवर्षी कडक लॉकडाऊनमुळे व्यापार होऊ शकला नाही. सध्या व्यवसाय सुरू असूनही विक्री अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे वर्षही नुकसानीत जाणार आहे.

रोहन देगावकर, मोबाईल विक्रेता.