corona in kolhapur-धक्कादायक, सीपीआरमध्ये कोराना संशयिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 17:56 IST2020-04-09T17:55:38+5:302020-04-09T17:56:40+5:30
कोरोनाचा गुणाकार वाढत असतानाच कोल्हापूरसाठी दिवसभरातले दुसरे धक्कादायक वृत्त आले आहे. सकाळच्या शाहुवाडी तालुक्यातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कोरोना केंद्रात गुरुवारी दुपारी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

corona in kolhapur-धक्कादायक, सीपीआरमध्ये कोराना संशयिताचा मृत्यू
कोल्हापूर : कोरोनाचा गुणाकार वाढत असतानाच कोल्हापूरसाठी दिवसभरातले दुसरे धक्कादायक वृत्त आले आहे. सकाळच्या शाहुवाडी तालुक्यातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या वृत्तानंतर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष कोरोना केंद्रात गुरुवारी दुपारी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
मृत पावलेली व्यक्ती हातकणंगले तालुक्यातील असून या व्यक्तीला अर्धांगवायू, न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास असल्याची माहिती सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या व्यक्तीने कोठेही प्रवास केला नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या ३४ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या चारपैकी दोन रुग्णांचे पहिले आणि दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळालेला असतानाच आता शाहुवाडी तालुक्यातील उचतच्या तरुणाला कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.