corona in kolhapur-फिरस्त्याची उचलबांगडी, सीपीआरमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:45 IST2020-04-20T15:43:39+5:302020-04-20T15:45:47+5:30
दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन समोर रस्त्यावरील फूटपाथवर मास्क न लावता आरडाओरड करीत बसलेल्या फिरस्त्याची व्हाईट आर्मीच्या जवानांनी उचलबांगडी करून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापुरात दसरा चौक परिसरात फिरस्त्याची चौकशी करताना व्हाईट आर्मीचे जवान.
कोल्हापूर : दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन समोर रस्त्यावरील फूटपाथवर मास्क न लावता आरडाओरड करीत बसलेल्या फिरस्त्याची व्हाईट आर्मीच्या जवानांनी उचलबांगडी करून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दसरा चौकातील शाहू स्मारकच्या समोरील फूटपाथवर एक फिरस्ता मोठमोठ्याने ओरडत बसलेला होता.
या मार्गावरून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या तो निदर्शनास आला. एका जागरुक नागरिकाने व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी जवान विनायक भाट, सुमित साबळे यांना रवाना केले. या जवानांनी त्या फिरस्त्याकडे विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्या पायास दुखापत झाली होती.
रक्तस्राव होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जवान पुढे सरसावले असता त्याने हुज्जत घातली. तोंडाला मास्क नाही, कसली सुरक्षा नाही, पोटाला काही नाही, अशा अवस्थेतील फिरस्त्याची अखेर जवानांनी उचलबांगडी करून सीपीआरमध्ये दाखल केले.