corona in kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:08 IST2020-05-20T16:04:09+5:302020-05-20T16:08:22+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून समजले असून आतापर्यंत कोल्हापूरातील कोरोना बाधितांची संख्या १५५ झाली आहे.

corona in kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून समजले असून आतापर्यंत कोल्हापूरातील कोरोना बाधितांची संख्या १५५ झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालेले १३६ रूग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखीन १९ रुग्णांची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक ३९ रूग्ण हे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. तर त्याखालोखाल १७ जण भुदरगडमधील आणि १५ जण राधानगरी तालुक्यातील आहे.
गेल्या १० दिवसांमध्ये मुंबईसह बाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत. परिणामी पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो चाकरमाने मुंबईत असून आता दोन महिन्यानंतर ही सर्व मंडळी आपल्या गावी परतत आहेत. याच वाढत्या परतण्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णही वाढत असल्याने जिल्ह्याची आकडेवारी वाढत आहे.
मंगळवारपर्र्यतची तालुकावार आकडे वारी खालीलप्रमाणे
- आजरा १०
- भुदरगड १७
- चंदगड ०५
- गडहिंग्लज ०४
- गगनबावडा ०२
- हातकणंगले ०१
- कागल ०१
- करवीर १०
- पन्हाळा १०
- १ मृत्यू
- राधानगरी १५
- शाहूवाडी ३९
- शिरोळ ०१
- नगरपालिका ०६
- १ मृत्यू
- कोल्हापूर महापालिका १२
- इतर जिल्हे ०३
- एकूण १३६
गगनबावडा तालुक्यातही रूग्ण
मंगळवारी रात्रीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ गगनबावडा तालुक्यातील एकाही कोरोना रूग्णाची नोंद झालेली नव्हती. मात्र रात्री आलेल्या अहवालांमध्ये या तालुक्यातही २ रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर शहरासह बाराही तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे.
वयोगटानुसार रूग्ण
- १ वर्ष ०
- १ ते १० वर्ष ११
- ११ ते २० वर्ष २१
- २१ ते ५० र्वष ९२
- ५१ ते ७० वषर् १२
- ७१च्या पुढील ०
- एकूण १३६