शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा रानमेवा विक्रेत्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

अनिल पाटील सरुड : सध्या करवंद, जांभूळ या कोकणच्या रानमेव्याचा हंगाम आहे. दरवर्षी वाड्या - वस्त्यांवरील अनेक महिला व ...

अनिल पाटील

सरुड :

सध्या करवंद, जांभूळ या कोकणच्या रानमेव्याचा हंगाम आहे. दरवर्षी वाड्या - वस्त्यांवरील अनेक महिला व पुरुषमंडळी डोक्यावर रानमेव्याची पाटी घेऊन रखरखत्या उन्हात ग्रामीण तसेच शहरी भागातही हा रानमेवा विकण्यासाठी गावोगावी फिरत असत; परंतु सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे संचारबंदी घोषित करत कडक निर्बंध लावल्याने रानमेवा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही मोठा फटका बसला आहे.

या संचारबंदीमुळे रानमेव्याच्या विक्रीसाठी विक्रेत्यांना परगावी जाता येत नसल्याने करवंद घ्या करवंद, आली डोंगरची मैना, खायाला एवढाच महिना या गल्लीबोळात दरवर्षी कानी पडणाऱ्या आरोळ्या यावर्षी विरळ झाल्या आहेत. परिणामी सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रानमेव्याचा आस्वाद घेण्यापासून बच्चे कंपनीसह आबालवृद्धांना वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकणच्या हद्दीवरील डोंगर कपारीमध्ये करवंद, जांभूळ आदी रानमेवा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. डोंगर कपारीतील धनगरवाड्या, वस्त्यांवरील लोकांना पावसाळा सुरू होईपर्यंत शेतीची कामे नसल्याने त्यांना या रानमेवा विक्रीचा विनाभांडवली व्यवसायाचा आधार या काळात मिळतो. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये झाडाझुडपातील करवंदांच्या जाळ्यांमधून करवंदे, जांभळे तोडून ती परगावी विक्रीसाठी आणली जातात. तसेच महामार्गावरील रस्त्यावरही हा रानमेवा विक्री केला जात असे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत अनेक गोरगरीब कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या रानमेव्याच्या विक्रीतून चालतो. परंतु सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने शासनाकडून कडक निर्बंध लावत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे रानमेव्याच्या या ऐन हंगामात गावोगावी जाऊन रानमेव्याची विक्री करण्यास विक्रेत्यांना मर्यादा आल्या आहेत. डोंगर कपारीमध्ये मुबलक प्रमाणात रानमेवा उपलब्ध असूनही संचारबंदीमुळे येथील लोकांना हा रानमेवा विक्री करण्यासाठी परगावी जाता येत नाही.