Corona to the female clerk in the ST's divisional office | corona virus : एस.टी.च्या विभागीय कार्यालयातील महिला लिपिकेला कोरोना

कोल्हापुरातील राजारामपुरी, तिसरी गल्ली येथे एस.टी.च्या विभागीय कार्यालयातील महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे महापालिकेने बॅरिकेड लावून परिसर सील केला आहे.

ठळक मुद्देराजारामापुरी तिसरी गल्लीतील परिसर सील कुटुंबातील २२ जण क्वारंटाईन : एस.टी.तील दोन कर्मचारी कोरोनाबाधित

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील टपाल विभागातील २५ वर्षांतील लिपिक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील मातंग वसाहत परिसरातील रहिवासी असून येथील १०० मीटरचा परिसर सील करण्यात आला. महिलेच्या कुटुंबातील २२ जणांना क्वारंटाईन केले असून सर्वांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत.

कागल येथील रहिवासी असणारे आणि एस. टी. महामंडळाच्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालयाच्या वाहतूक शाखेतील लिपिकाचा कोरोनाचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर विभागीय कार्यालयाती कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. संपूर्ण कार्यालयातील ४० कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून तपासणी करण्यात आली.

यामध्येच टपाल विभागातीलही महिला लिपिकाचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी, तिसरी गल्ली, मातंग वसाहतीमधील रहिवासी असून महापालिकेने हा परिसर बॅरिकेड लावून सील केला. यावेळी स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, माजी महापौर शिवाजी कवाळे, कांचन कवाळे, कादंबरी कवाळे यांनी तत्काळ येऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन वेळा औषध फवारणी करवून घेतली. उपायुक्त निखिल मोरे, उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनीही भेट दिली.

Web Title: Corona to the female clerk in the ST's divisional office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.