शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

corona cases in kolhapur : ९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी, १०७२ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 9:58 AM

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवे ९२१ रुग्ण सापडले, तर बळींचा आकडाही ५० वर आला. हाच मृत्यूचा आकडा गेल्या दोन दिवसांपेक्षा दहा ते पंधराने कमी झाला आहे. १०७२ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

ठळक मुद्दे९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी, १०७२ जण कोरोनामुक्त करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवे ९२१ रुग्ण सापडले, तर बळींचा आकडाही ५० वर आला. हाच मृत्यूचा आकडा गेल्या दोन दिवसांपेक्षा दहा ते पंधराने कमी झाला आहे. १०७२ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गेल्या चार दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्यांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या उच्चांकावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यासह स्थानिक प्रशासनानेही नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून, संपूर्ण तालुक्यात कर्फ्यू लावले जात आहेत. गावेच्या गावे, शहरेच्या शहरे वेशीवर बॅरिकेड्स लावून येणे-जाणेच बंद केले जात आहे. त्याचा परिणाम दिसत असून, दीड हजारावर पोहोचलेली रुग्णसंख्या आता हजाराच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला आहे. यातील सात इतर जिल्ह्यांतील, तर ४३ मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्याही ११ हजार २३९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात १०७२ जण डिस्चार्ज झाले आहेत.५० पैकी ३९ मृत्यू ६० च्या आतीलरविवारी कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्या वयोगटावर नजर टाकल्यावर २४ ते ५० या कमावत्या गटातील नागरिकांची संख्या जास्त दिसत आहे. एकूण मृत्यूपैकी ११ मृत्यू हे ६० वयावरील आहेत, तर उर्वरित तब्बल ३९ मृत्यू हे साठीच्या आतील आहेत. त्यातही ५० च्या आतील मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. कुंभोज येथील २४ वर्षीय, तर आर. के. नगर येथील ३१ वर्षीय तरुण, वेसर्डे व शनिवार पेठ येथील ३४ वर्षीय तरुणी कोरोनाला बळी पडल्या आहेत.जिल्ह्यात या ठिकाणी झाले कोरोनाचे मृत्यूकोल्हापूर शहर : १३ जवाहरनगर, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, कारंडे मळा, आर. के. नगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सिंधूनगर, हरिओम नगर रंकाळा, शिवाजी पार्क, गुजरी, सरनाईक वसाहत,

  • करवीर : ४

भुये, माटेनगर, निगवे दुमाला, वडणगे,

  • शिरोळ : ३

नवे दानवाड, जयसिंगपूर, कागवाड,

  • पन्हाळा : ४

अंंबपवाडी, शहापूर, कोडोली, बच्चे सावर्डे,

  • भुदरगड : ४

सिमलवाडी करीवाडी, वेसर्डे, करंबळी, गारगोटी, हणबरवाडी,

  • हातकणंगले : ४

कुंभोज, कोरोची, अंबप, रुकडी,

  • चंदगड : १ कासेगळे,
  • कागल : १ सांगाव,
  • आजरा : ३ महागाव, आजरा, खोराटवाडी,
  • गडहिंग्लज: १ मुगळी,
  • इचलकरंजी : ४ इचलकरंजी,

कोरोना अपडेट९ मे २०२१ ची आकडेवारी

  • आजचे रुग्ण : ९२१
  • आजचे जिल्ह्यातील मृत्यू : ४३
  • इतर जिल्ह्यातील मृत्यू : ०७
  • उपचार घेत असलेले : ११ हजार २३९
  • आजचे डिस्चार्ज : १०७२
  • सर्वाधिक रुग्ण :
  • कोल्हापूर शहर : २११
  • करवीर ११९
  • शिरोळ १०४
  • हातकणंगले : ९०

कोल्हापूर शहर मृत्यू : १३ (प्रत्येकी एक)जवाहरनगर, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, कारंडे मळा, आर. के. नगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सिंधूनगर, हरिओम नगर रंकाळा, शिवाजी पार्क, गुजरी, सरनाईक वसाहत.तालुकानिहाय मृत्यू   रुग्ण

  • करवीर          ०४      ११९
  • हातकणंगले ०४         ९०
  • भुदरगड        ०४        १०
  • पन्हाळा       ०४         ५५
  • शिरोळ        ०३         १०४
  • आजरा          ०३          ५०
  • शाहूवाडी         ००        २४
  • गडहिंग्लज    ०१         ३७
  • चंदगड          ०१         ३९
  • राधानगरी      ००       ०९
  • कागल            ०१     २९
  • गगनबावडा     ००    ०२

नगरपालिकानिहाय रुग्ण : ५५

  • इचलकरंजी २८
  • जयसिंगपूर २५
  • पेठवडगाव ०२
  • दिवसभरातील लसीकरण : २३२८
  • पहिला डोस घेतलेले नागरिक : १८०३
  • दुसरा डोस घेतलेले नागरिक : ५२५
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर