corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 665 जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 07:52 PM2020-06-18T19:52:40+5:302020-06-18T19:53:51+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 728 रूग्णांपैकी 665 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 108 प्राप्त अवालापैकी 105 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (साताऱ्याचा 1 अहवाल निगेटिव्ह ) आजअखेर जिल्ह्यात एकूण 55 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

coroana | corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 665 जणांना डिस्चार्ज

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 665 जणांना डिस्चार्ज

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 665 जणांना डिस्चार्ज हातकणंगले व राधानगरी तालुक्यातील 2 पॉझीटिव्ह

कोल्हापूर : जिल्ह्यात आजअखेर 728 रूग्णांपैकी 665 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 108 प्राप्त अवालापैकी 105 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (साताऱ्याचा 1 अहवाल निगेटिव्ह ) आजअखेर जिल्ह्यात एकूण 55 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 2 पॉझीटिव्ह अहवालामध्ये हातकणंगले तालुक्यातील 1 व राधानगरी तालुक्यातील 1 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 76, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 84, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 67, शाहुवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 720 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 728 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 728 रूग्णांपैकी 665 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 55 इतकी आहे.

Web Title: coroana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.